Ad will apear here
Next
रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा योजनेंतर्गत अर्थसाह्य
पालघर : रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा या योजनेच्या माध्यमातून नुकतेच अर्थसाह्य करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत ही मदत सुपूर्द करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली.

रूपाली वरठा या नऊ वर्षांच्या मुलीला जिवंत वीजवाहिनीचा झटका लागून, ती अत्यंत गंभीरत्या जखमी झाली होती. तिच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे या घटनेची आणि रूपालीच्या वेदनांची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेच्या ‘तन्वी धनवा’ योजनेअंतर्गत तिला १५ हजार रुपये देऊन तिला मदत करण्यात आली आहे. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारीही वेळोवेळी संबंधीत डॉक्टरांकडे तिच्या प्रकृतीची विचारपूस करतात. समाजसेवेच्या भावनेतून अनेक पत्रकारांनीही रूपालीला मदत केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा संवेदनशील भावनेतून काम करणाऱ्या सर्व जणांचे आभार मानले आणि रूपाली लवकरात लवकर बरी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DYZSBD
Similar Posts
शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन
डहाणूमध्ये पुनरागमन आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर डहाणू (पालघर) : नोव्हेंबर-डिसेंबर २०१६मध्ये डहाणू तालुक्यातून हजारोंच्या संख्येने वीटभट्ट्या व बांधकाम आणि इतर कामांसाठी स्थलांतरित झालेल्या बहुतांश कुटुंबांचे गावामध्ये पुनरागमन झाले आहे. या सर्व कुटुंबांची तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याकरिता डहाणूच्या
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाला जिल्हा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language